सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे कुसुमाग्रज. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, तसेच नाटकार कथाकार व समीक्षक मराठी अभिरुचीवर चार दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव टाकणारे श्रेष्ठ कवी, नाटककार तसेच कादंबरीकार, आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे महान लेखक, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारी वृत्ती आणी शब्द कलेचे प्रभुत्व असणारे असे कुसुमाग्रज. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दूसरे साहित्यिक.
कुसुमाग्रजांचा परिचय
कुसुमाग्रजांचा जन्म (27 फेब्रुवारी 1912) पुणे येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज़ाना दत्तक घेतले. दत्तक घेतल्याने त्याच नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसंवत या तालुक्याच्या गावी स्थायी झाले. कुसुमाग्रजाचे बालपण इथेच गेले. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. कुसुमाग्रजाना कुसुमाग्रज काय म्हणतात? कुसुमाग्रजाना सहा भाऊ आणी कुसुम नावाची एक लहान बहिण होती. एकलूती एक बहीण असल्याने सर्वांची लाडकी होती, कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव धारण केले तेव्हापासुन शिरवाडकरांना कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण पिपंळगाव आणि माध्यमिक शिक्षण नाशिक येथे झाले. त्यानंतर त्यांनी प्रा. ठा. कला महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी करण्याऐवजी स्वतःचे लेखन कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना चित्रपट क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नाशिकच्या गोदावरी सिनेमा निर्मिती कंपनीच्या 'सती सुलोचना' या चित्रपटाची पटकथा लिहिली आणि त्यात लक्ष्मण ही भूमिकाही केली. त्यानंतर त्यांनी स्वराज्य, प्रभात, धनुर्धारी आणि नवयुग यासारख्या अनेक नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले.
सत्याग्रहात सहभाग
Credit:- google
तसेच, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शिरवाडकरांचे लेखन हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातून ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठी साहित्य आणि समाजात झालेल्या सामाजिक जागृतीच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या लेखनातून राष्ट्रीय चळवळी, दलित चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक घटनांचे प्रतिबिंब दिसून येते.
कुसुमाग्रजांचे प्रसिध्द नाटके
पत्रकारितच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर कवी शिरवाडकर यांची भेट मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेकर यांच्याशी झाली. रंगभूमीचा सुवर्णकाळ संपवू नये यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे भालेकर, शिरवाडकरांना नाटक लिहिण्यास प्रेरित केले. कवी असलेले शिरवाडकर नाटक लेखनातही पारंगत झाले. त्यांनी मराठी माती, जीवन लहरी, किनारा वादळवेल ही काव्यसंग्रहे लिहिली. कुसुमाग्रज यांची दुसरा पेशवा, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला राजमुकुट ही नाटके प्रसिद्ध आहेत.विष्णु सखाराम खांडेकर यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले होते. त्यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा काव्यसंग्रह स्व खर्चाने प्रकाशित केला. या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत खांडेकर यांनी कुसुमाग्रजांना 'मानवतेचा कवी' असे संबोधले, ज्यामुळे कुसुमाग्रजांच्या साहित्यिक कारकिर्दीला मोठी प्रेरणा मिळाली. कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये समाजातील असंतोष दिसून येतो, पण त्याचबरोबर नवीन काळाची आशाही दिसते. भारत छोडो आंदोलनाच्या काळात प्रकाशित झालेल्या या कवितांमध्ये गुलामगिरी विरोधी विचार मांडले होते आणि तरुण पिढीला प्रेरणा दिली होती.
नाटकाचे भाषांतर
१९४३ नंतर, कुसुमाग्रजांनी ऑस्कर वाइल्ड, मोलिएर, मॉरिस मॅटरलिंक आणि शेक्सपियर यासारख्या जगप्रसिद्ध नाटककारांच्या नाटकांची मराठी भाषेत रूपांतरे करण्यास सुरुवात केली. त्यांनी विशेषतः या नाटककारांच्या शोकांतिकांवर भर दिला. त्यांच्या या प्रयत्नामुळे मराठी रंगभूमीला एक नवीन दिशा मिळाली आणि ती अधिक समृद्ध झाली. हे काम त्यांनी १९७० च्या दशकापर्यंत सुरू ठेवले.
श्रीराम लागू यांनी विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावर आधारित 'नटसम्राट' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात मुख्य भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे साकारली होती. कुसुमाग्रजांनी आपले पहिले नाटक 'दूरचे दिवे' आणि पहिली कादंबरी 'वैष्णव' ही दोन्ही १९४६ मध्ये प्रसिद्ध केली होती. १९४६ ते १९४८ या काळात ते 'स्वदेश' या मासिकाचे संपादक होते.कुसुमाग्रज हे फक्त कवीच नव्हते तर एक उत्तम लेखकही होते. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी विश्वसाहित्यातील प्रसिद्ध नाटक 'मॅकबेथ'चे मराठीत 'राजमुकुट' किंवा 'द रॉयल क्राउन' या नावाने भाषांतर केले. तसेच 'ऑथेलो' या शेकस्पिरच्या आणखी एका नाटकातही त्यांनी बदल करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवले. याशिवाय, त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गीत लिहिली आहेत.
श्रीराम लागू यांनी विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावर आधारित 'नटसम्राट' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात मुख्य भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे साकारली होती. कुसुमाग्रजांनी आपले पहिले नाटक 'दूरचे दिवे' आणि पहिली कादंबरी 'वैष्णव' ही दोन्ही १९४६ मध्ये प्रसिद्ध केली होती. १९४६ ते १९४८ या काळात ते 'स्वदेश' या मासिकाचे संपादक होते.कुसुमाग्रज हे फक्त कवीच नव्हते तर एक उत्तम लेखकही होते. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी विश्वसाहित्यातील प्रसिद्ध नाटक 'मॅकबेथ'चे मराठीत 'राजमुकुट' किंवा 'द रॉयल क्राउन' या नावाने भाषांतर केले. तसेच 'ऑथेलो' या शेकस्पिरच्या आणखी एका नाटकातही त्यांनी बदल करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवले. याशिवाय, त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गीत लिहिली आहेत.
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
Credit:- Google
- 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड
- 1964 च्याच मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
- 1970 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 51व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
- 1990 साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
- त्यांचा जन्म दिवस (27 फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कवितासंग्रह Kusumagraj Kavita
- अक्षरबाग (1990)
- चाफा ( 1998)
- जीवन लहरी (1933)
- जाईचा कुंज (1936)
- थांब सहेली (2002)
- किनारा (1952)
- छंदोमयी (1982)
- पांथेय (1989)
- प्रवासी पक्षी (1989)
- मराठी माती (1960)
- महावृक्ष (1997)
- माधवी (1994)
- मारवा (1999)
- हिमरेषा (1964)
- स्वगत (1962)
- विशाखा (1942)
- रसयात्रा (1969)
- मेघदूत (1956)
- समिधा (1947)
- वादळ वेल (1969)
- मूक्तायंन (1984)
नाटके
- आनंद
- दूरचे दिवे
- एक होती वाघीण
- राजमुकुट
- किमयागार
- कैकेयी
- मुख्यमंत्री
- ययाती देवयानी
- विदूषक
- नाटक बसते आहे
- बेकेट
- महंत
- देवाचे घर
- नटसम्राट
- दिवाणी दावा
- आमचं नाव बाबुराव
- कौंतेय
- जेथे चंद्र उगवत नाही
- दुसरा पेशवा
- वीज म्हणाली धरतीला
- वैजयंती
कथा संग्रह
- जादूची होडी (बालकथा)
- प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
- काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
- अंतराळ (कथासंग्रह)
- सतारीचे बोल (कथासंग्रह)
- फुलवाली (कथासंग्रह)
- अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
- एकाकी तारा
- बारा निवडक कथा (कथासंग्रह)
निवास स्थान
Credit:-googleमराठी साहित्याला अतुलनीय योगदान देणारे कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर), हे कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे निधन 10 मार्च 1999 रोजी झाले. त्यांचे नाशिक येथील निवासस्थान आज कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणून ओळखले.
FAQ
1)कवी कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता आहे?
जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला.
2)कुसुमाग्रज हे नाव कसे पडले?
एकलूती एक बहीण असल्याने सर्वांची लाडकी होती, कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव धारण केले तेव्हापासुन शिरवाडकरांना कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.3)कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय आहे?
त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
4)कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार कधी मिळाला?
कुसुमाग्रजांना 1987 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.5)मराठी दिन का साजरा केला जातो?
मराठी भाषेच्या समृद्ध वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वारसाचा गौरव करण्यासाठी, दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो